आज संकष्टी चतुर्थी।।।
गज म्हणजे हत्ती त्याचे मुख शिवाने स्व हस्ताने बाळ गणेशाचे मुख शनी च्या दृष्टीने निर्जीव होत गेले त्या मुळे पार्वती दुःख निरसन करण्यास शिवाने विरभद्रास प्रथम जो प्राणी दिसणं घडले त्याचे मुख गजांनास लावावे। त्या मुळे विरभद्रास प्रथम बाळ रुपात हत्ती दिसला त्या चे पूर्व जन्मी चे भाग्य की ते मुख गणेश पुत्राचे मुखास लावल्यावर शिव शक्ती ने तो परत सजीव होऊन शुंड हलविता हलविता बाळ लीला करू लागला ।
तो सर्व देवतांचे प्रथम पूजन करण्याचा अधिकारी झाला बुद्धिमान हत्ती चे गुण बळ श्रवण करून मोठया उदरात दुसऱ्याचे अवगुण सामावून घेणारा असे सर्प गळ्यात जानवे धारण करणारा हेरंब यास चार हातात अंकुश पाश परशुराम यास शिव भेटीस आले असता पार्वती कैलास शिखर कुटीत स्नान करीत असल्याने त्याने परशुराम याना आत प्रवेश नाकारला त्या मुळे संताप अनावर होत त्यांनी शिवपुत्रा स दंड म्हणून युद्ध केले व तो पराभूत होत नाही हे पाहून आपले शिव अस्त्र जय शिवाने त्यांना दिले होते तो परशु सोडला पण शिव तेथे प्रगत होत त्यांनी हे युद्ध थांबवले व गणेशास त्या अस्त्राचा सन्मान करण्यास दंत स्थानी आघात केला त्या मुळे जो अर्धा दात पडला तोच शिव शक्ती म्हणून पित्याने त्यांना शत्रूला मारण्यास शस्त्र म्हणून धारण करण्यास सांगितले त्या मुळे एकदंत दया वन्त चार भुजा धारी विनायकला सर्व देवतांनी मोदक ज्यात गुळ व खोबरे हे सारण असते ते बलवर्धक असते ते भक्षण करण्यास दिले तो मोदक त्याने चतुर्थ हस्तांत धारण केला आहे.
इकडे तिकडे दुड दुड संचार करण्यास त्याने मूषक हे वाहन निवडून त्या उंदरास मन दिला आहे।पृथ्वी परिक्रमा करण्यास जो प्रथम येईन तो श्रेष्ठ असे पार्वती शिव यांनी शुल्क अंबर वस्त्र नेसलेल्या गौरी पुत्र व बंधू षड आनंन कार्तिक यास सांगून पैज लावली। स्कंध याने खरच वसुंधरा परिक्रमा मयूर वाहन आरूढ होत सुरू केली पण बुद्धिइमान गणपती ने केवळ परिक्रमा पूर्ण करून येत असलेल्या बंधुस पाहत त्याने दुड दुड चालीत शिव पार्वती माता पित्यास प्रदक्षणा घालीत माता पिता हे च पृथ्वी मोलाचे आहे हे दाखवीत ते शर्यत जिंकले। रुसून जात बंधू मुरगंम स्वामी ने या पुढे मी कोणत्याही स्त्री चे मुख पाहणार नाही केवळ माता म्हणून तुलाच वंदन करीत जाईन असे या मातृ महतीने भीष्म सारखी वचन देत प्रतिसाद दिला। पार्वतीने या बद्दल धुम्र वर्ण गणेशास ब्रहम देव पुत्री रिद्धी व सिद्धी याना त्याच्याशी गृहस्थ आश्रम करण्यास गणेशाचे पाणी ग्रहण करून दिले। त्यास या मुळेच सिद्धी बुद्धी गणेश म्हणून वंदन करतात. त्यांना पुढे शुभ व लाभ असे 2 पुत्र झाले. त्या मुळे कोणत्याही गोष्टी चा आरंभ करताना सर्व शुभ लाभ लिहून नंतर श्री गणेश यांचे नाव श्रीगणेशायनमहा असे लिहितात व कार्य आरंभ करतात। घरोघरी सर्व भारतीय आपल्या गुहा च्या प्रवेश द्वारावर संकटे नाहीसे करण्यास गणपती चे प्रतिमा आरूढ करतात व नित्य त्याचे दर्शन घेत गृहात प्रवेश करतात।
सिंधुरा सूर देत्यास वध केल्याने त्याचे शरीराची अग्नी ने लाही लाही झाली ते शांत करण्यास त्यांनी शेंदूर दुर्वा सर्प जास्वंदी फुल धारण केले आहे। आता गणेशास 21 दुर्वा का वाहतात याचे उत्तर तुम्ही गुगल वरून शोधून कधी काढता व किती प्रतिसाद देतात ते पाहू थोडा गृहपाठ देणे प्रभोधन झाल्यावर आवश्यक असते। हरी ओंम ।।मित्रानो रोज मला या माध्यमातून केवळ लिहिण्यास स्क्रीन मी कागद व लेखणी म्हणून तर्जनी वापरून सकाळी वा निवांत समयी माझा छंद जोपासत मनातील विचार जे प्रपात स्वरूप उसळी घेतात ते लिहून दुधाची तहान ताकावर भागवतो। त्या मुळे हे स्व निर्मित अक्षर बालक आहे शुद्ध लेखन दुरुस्त करण्यास मी वेळ देऊ शकत नाही त्या बद्दल माफी। जो पढेगा उसका भला जो स्कीप करेंगा उसका भी भला।परंतु आवडले तर घरातील पुढील पिढीस सुना मुले नातू नात याना हे वाचून दाखवावे वा त्यांच्या मोबाइलला फॉरवर्ड करावे त्यांच्या यथावकाश वाचन करण्यास।शुभम भव तु । रवींद्र देव