नकारात्मकता' कशी येते ते पहा.
मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी
मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!
काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला,
एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता,
आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते.
त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता.
हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते.
पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले.
त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी,
अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.
आता एक वेगळीच गंम…
[19:55, 01/10/2020] +91 95795 21133: 🙏🌹🤝🌀💧💦💧🌀🤝🌹🙏
खालील लेखात आपण काय वाचन कराल
१)अधिक महिन्यात अन्न दानाचे महत्त्व
२)आक्टोंबर महीन्यात जन्मलेल्या जातकाचे भविष्य
३)भैरवनाथ मंदिर किकली
४)काळाराम मंदिर नाशिक
५)प्रतीबालाजी देऊळ गांव राजा
६)हिंदु धर्मात शवांना अग्नी डाग का देतात
७)खालील गोष्टी आरोग्यासाठी घातक आहे.
८)हे पांच महापाप चुकुनही करु नये
९)नितीकथा
१०)तुलना करु नये
११)कोहळा लावण्याची पध्दत
~~~~~~~
-------------------------------
अधिक महिण्यातील
अन्नदानाचे महत्व :----
-----------------------------------
१. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो.
२. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.
३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.
४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.
५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.
६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते.
७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.
८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे.
९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.
१०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून
अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो.
११. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते.
१२. अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव `सात्विक आहार' होय.
१३. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो.
१४. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही.
१५. भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात.
----------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवावार🌹 ------------------------------------
जन्म ऑक्टोबर महिन्यात
झालेल्या जातकाचे भविष्य
--------------------------------------
तुमचा जन्म कुठल्या साली ऑक्टोबर महिन्यात झाला असेल तर अॅस्ट्रोलॉजीप्रमाणे तुम्ही फारच शांत स्वभावाचे असता.
दिसण्यात तुम्ही एवढे स्मार्ट असता की लोकांना तुम्हाला बघून थोडी ईर्ष्या होणे स्वाभाविक आहे.
सुरवातीला तुमचे आकर्षण थोडे कमी असू शकते पण जसे जसे वयात येता तुमचे सौंदर्य आणि आरोग्य सुधारतं जात.
तुमचे व्यक्तित्व राजसी असते. तुम्हाला अजागळपणा बिलकुल आवडत नाही. व्यवस्थित राहणी आणि सुंदर दिसण्यात फरक असत.
तुम्ही व्यवस्थित राहणाऱ्यांपैकी आहात, भले तुमचे नाक-डोळे साधारण असले तरी तुमच्यातील असणारे आकर्षण सर्वांची मन जिंकण्यासाठी पुरेशी असते.
तुमच्यात कठीण परिस्थितीतून बाहेर निघून येण्याची क्षमता असते. तुमची परिस्थिती कितीही वाईट का ना असो, तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढनच घेता. कुठल्याही मुद्द्यावर लगेचच आपली प्रतिक्रिया न देता वेळानुसार मापून तोलून बोलायची सवय असते.
प्रेमाच्या बाबतीत तुमचा हात कुणी धरू शकत नाही. आपल्या साथीदाराला जेवढे प्रेम तुम्ही करता तेवढे कोणीच करत नाही पण इतके केले तरी प्रेमाच्या बाबतीत तुमच्या पदरी निराशाच येते, पण तुमची ही अवस्था घरातील मंडळींना दिसून येत नाही.
तुमच्यासाठी टॅक्नोलॉजी, राजकारण, कला, अभिनय, व्यापार किंवा मेडिकल सारखे क्षेत्र उपयोगी असतात.
तुमच्यातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेले तरी तिथे तुम्ही तुमची जागा बनवण्यात यशस्वी ठरता.
ऑक्टोबरमध्ये जन्म घेतलेल्या मुली म्हणजे सौंदर्याची खाण असतात. या मुलींचे डोळे फारच सुंदर असतात.
मनाच्या थोड्या डिप्लोमॅटिक असतात पण कुणाला त्रास द्यायचा त्यांचा उद्देश्य नसतो. प्रेमाच्या बाबतीत फारच अल्हड असतात. या मुलींमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो.
या महिन्यातील मुलींसाठी एक सल्ला म्हणजे थोडे बोलणे वाढवायला पाहिजे, तसेच चांगले-वाईट मित्रांमध्ये फरक करता यायला पाहिजे. आपल्या प्रतिभेचे शोषण होण्यास टाळायला पाहिजे व आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकण्याचा प्रयत्न करता यायला पाहिजे.
या महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांसाठी लकी नंबर, रंग, दिवस व स्टोन खाली दिले आहे.
लकी नंबर : 2, 6,7,8
लकी कलर : मेहरून, पिकॉक ग्रीन, रॉयल ब्लॅक
लकी डे : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
लकी स्टोन : डायमंड
-------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
----------------------------------------
-----------------------------------
भैरवनाथ मंदिर , किकली
ता.वाई जि.सातारा
------------------------------------
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या किकली गावात हेमाडपंती पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. हे देऊळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
तिथेच डावीकडे चंदनगड तर उजवीकडे वंदनगड किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते. १८-२० पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते संकुलातील एक मंदिर सुस्थितीत तर दोन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. मुख्य मंदिर भैरवनाथाचे असून मंदिरावरती नक्षीकामाची रेलचेल आढळते. या मंदिरात मुखमंडपातच नंदी आहे. वेदिकेवरील व्यालपट्टी, मुखमंडपावरील छतावर अनेक प्रकारची झुंबरे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गज शरभ, व्याल, दैवीशक्ती असून, उंबऱ्यावर कीर्तिमुख तसेच उंबऱ्यासमोर शंखावर्त अर्धचंद्र पहावयास मिळतो.
सभामंडपातील रंगशिळेवर चार भरजरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. असे रामायण कोरलेले हे मंदिर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर होत.
काही ठिकाणी शिवतांडव, वामन वतार, सुरसुंदरी, क्षेञपाल अशी शिल्पेआहेत. मंदिराचा गाभारा त्रिदल पद्धतीचाआहे. भैरवनाथासमोरिल अंतराळगृह इतर दोन अंतराळगृहापेक्षा रेखीव आहे. या गृहात दोन देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि एक ऋषीमुनी (स्थानिक कथेनुसार बहुधा मच्छिंद्रनाथ) आहेत. गाभाऱ्यात उग्र अशी भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग आहे.
किकली हे पाचशे सहाशे उंबरा असलेले गाव असले तरी मंदिराप्रमाणेच या गावात शंभर दीडशे वीरगळी पहावयास मिळतात. त्यामुळे गावाला “वीरगळीचे गाव" हे विशेषण शोभून दिसेल. येथे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजांच्या वीरगळी आणि त्याही सुस्थितीत आहेत.
माहिती संदर्भ :- संकेत बाबर किकलीकर ▶ | ऐतिहासिक वाडे व गढी |
----------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
- -------------------------------------
काळाराम मंदिर , नाशिक
-------------------------------------
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले.
येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात.
मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय.
या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे. हा भाग जुन्या नाशकात येत असल्याने येथे वाहनतळाचा (पार्किंगचा) प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे श्रेयस्कर आहे.
--------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
-- ---------------------------------
प्रति बालाजी मंदिर
देऊळगाव राजा
------------------------------------
देऊळगाव राजा ह्या बुलढाणा जिल्ह्यातील शहरात असलेले बालाजी मंदिर श्री लक्ष्मी व्यंकटेशाला समर्पित आहे.
येथील श्री बालाजी हा आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजींचा अवतार मानला जातो. मंदिरात देवी लक्ष्मीसमवेत श्री वेंकटेश यांची मूर्ती तर्जनीइतकीच लहान असून पाच मौल्यवान धातूंनी बनलेली आहे.
‘सिंदखेडकर जाधव’ घराण्याचे संस्थापक, जिजाबाई यांचे वडील आणि राजा लखुजीराव जाधव यांचे वंशज श्री. राव जगदेवराव यांनी १९६२ मध्ये देऊळगाव राजा येथे ‘बालाजी महाराज संस्थान’ ची स्थापना केली. ‘बालाजी संस्थान’ हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे आणि विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेऊन नेहमीच सामाजिक सेवांमध्ये कार्यरत असते. आपल्या सामाजिक योगदानाचा विस्तार करण्यासाठी १९६७ मध्ये ‘बालाजी संस्थान’ ने देऊळगाव राजा येथे ‘श्री व्यंकटेश कला व वाणिज्य महाविद्यालय’ सुरू केले.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६७ पर्यंत देऊळगाव राजा येथील उच्च शिक्षणाचा दर्जा अक्षरशः मध्ययुगीन काळासारखा होता. ‘श्री बालाजी संस्थान’ चे तत्कालीन विश्वस्त, स्वर्गीय राजा राजेंद्रसिंग जाधव यांना उच्च शिक्षणाचे महत्त्व, विशेषत: वंचित आणि राज्य व देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या शिक्षणाची महती लक्षात आली. या भागातील उच्च शिक्षणाची तीव्र गरज लक्षात घेऊन त्यांनी देऊळगाव राजाच्या परिघामध्ये लोकांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरू केले. सध्या मा. राजा विजयसिंह मानसिंगराव जाधव हे संस्थानचे अनुवंशिक विश्वस्त आहेत आणि त्यांच्या सक्षम व मोलाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने उल्लेखनीय प्रगती केली आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे 'श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव' भरविला जातो, ज्याचे मुख्य आकर्षण असते, 'लाटा मंडपोत्सव'!
२१ लाकडी खांबांच्या साहाय्याने येथे मंदिरासमोर ४२ मंडप उभारले जातात. प्रत्येकी एक फूट जाडीच्या या खांबांची उंची ३० फूट असते. दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्यानंतर दहाव्या दिवशी 'कीर्तन', 'दहीहंडी' आदी कार्यक्रमानंतर हे मंडप काढले जातात.
माहिती संदर्भ :-
भारतातील प्राचीन मंदिरे व शिल्पेमधील राजेन्द्र म्हात्रे (Rajendra Mhatre)च्या पोस्टवरून माहिती -
---------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
--- ------------------------------------
हिंदू धर्मात शवांना अग्नी
देण्याची पद्धत का आहे?
------------------------------------
हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार "अंत्येष्टी" हा आहे, यातील एक उपप्रकार म्हणजे "दहन कर्म". यामध्ये मृताच्या शरीरावर अग्निसंस्कार केले जातात.
यामागील धार्मिक कारणमीमांसा खालीलप्रमाणे.
मृत्यू लोकांतून त्यापुढील लोकांमध्ये आत्म्याची मार्गक्रमणा होण्यासाठी अग्निसंस्कार केला जातो. दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे उच्च कोटीचे आत्मे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते..
आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो.
प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.
अग्नी हा सर्व लोकांमधील दुवा, वाहक, दूत समजला जातो. जसे की पृथ्वीतलावरील यज्ञात दिलेल्या आहुती, अग्नी स्वर्गातील देवतांपर्यंत पोचवतो असे समजले जाते. त्याचप्रमाणे मृताच्या आत्म्याची प्रगती करविण्यासाठी अग्नीचे आवाहन केले जाते.
रामकृष्ण हरी
----------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
---------------------------------------
खालील गोष्टी मानसिक
आरोग्यासाठी घातक आहेत
--------------------------------------
१) प्रत्येक वेळी इतरांशी तुलना करणं -
अमुककडे अमकी वस्तू आहे तर माझ्याकडे असायलाच पाहिजे, किंवा एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा सुंदर असेल तर मी तिच्याइतकी सुंदर का नाही असा विचार करून दुःखी होणे, खंत करून घेणे,
२) सोशल मीडियाचा जास्त वापर-
सोशल मीडिया वर सगळेच आनंदाचे क्षण सामायिक करतात, दुःखाचे नाही. पण पाहणारा असाच विचार करतो की मी सोडून सगळेच आयुष्यात खूप सुखी आणि आनंदात आहेत. पण प्रत्यक्षात तसं नसतं
आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा- आपल्या क्षमतेपेक्षा आयुष्यात आपल्याला खूप काही मिळालं पाहिजे, पण आपले तसे प्रयत्न नसतील, आपल्याला तेवढं यश नाही मिळालं तर आपण दुखीच होतो
३) इतरांकडून अवास्तव अपेक्षा-
इतरांच्या वागणुकीतून, कृतीतून आपल्याला अपेक्षित असणारीच कृती झाली पाहिजे असा आग्रह ठेवणं
४) इतरांशी बोलताना माझा मुद्दा बरोबर दाखवण्यासाठी घातलेला वाद -
स्ट्रेट फॉरवर्ड प्रकारची लोक यात मोडतात,
५) अतार्किक विचार-
वास्तवाला धरून विचार न करणं
६) अति विचार-
खूप विचार करण्याच्या सवयीमुळेसुद्धा मनाला ताण निर्माण होतो.
७) नकारात्मक विचारांच्या लोकांचा सहवास-
अशी लोक सतत रडत असतात, सकारात्मक बाजू बघूच शकत नाहीत, प्रत्येक गोष्टीत समस्या दिसतात. आशा लोकांत राहिल्याने सुद्धा मानसिक शांतता राहत नाही.
----------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
---------------------------------------
हे पाच महापाप,
चुकूनही करू नका
------------------------------
भविष्यपुराणानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीर, मन आणि वाणीने करण्यात आलेल्या पापाचे फळ भोगावे लागते. यामधील काही काम महापाप मानण्यात आले आहेत.
येथे जाणून घ्या, असे महापाप जे करणाऱ्या व्यक्तीला नरकात भोगाव्या लागतात सर्वात जास्त यातना...
१) एखाद्याला धोका देऊन, चुकीचे काम करून किंवा एखाद्याची वस्तू चोरून धन जमा करणे तसेच धनाचे दान न करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा भविष्यपुराणात महापापी मानण्यात आले आहे.
२) गुरु पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा गुरु शय्यावर दुष्कर्म करणे हेसुद्धा सर्वात मोठे पाप मानले गेले आहे. अशा व्यक्तीला त्याच्या पापाची शिक्षा अवश्य मिळते.
३) प्राण्यांवर अत्याचार, ब्राह्मणाची हत्या किंवा त्याचा अपमान करणे. नोकरांना वाईट वागणूक देणाऱ्या लोकांना कुंभीपाक नामक नरकात शिक्षा भोगावी लागते.
४) प्रत्येक व्यक्तीने दारू आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे. कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्या व्यक्ती महापापाचा भागीदार होतो.
५) जो व्यक्ती इतरांची वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न करतो, तो पापी असतो. चोरी करणारा आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही नरकात दुःख भोगावे लागते.
या पाच कामांमुळे कधीही मिळत नाही मुक्ती, मानले जातात महापाप, चुकूनही करू नका
--------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
---- -----------------
नीतिकथा
------------------
🍅 एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगितले.
🍅 प्रत्येक टमाट्यावर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तिचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते.
🍅अशा रीतीने, जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टमाटे त्यांनी आणावयाचे होते.
🍅 ठरलेल्या दिवशी, सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टमाटे आणले.
🍅 काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टमाटे, ते द्वेष करीत असलेल्या संख्ये बरहुकूम आणले.
🍅 शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टमाटे ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.
🍅 जस जसे दिवस उलटू लागले, तस तसे मुले टमाट्यांच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.
🍅 ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टमाटे होते त्यांनी तक्रार केली की, त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.
🍅 आठवड्यानंतर, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, " तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले ? "
🍅 मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टमाट्यांच्या जड वजनाबद्दल तक्रारी केल्या. विशेषत: ज्यांनी अनेक टमाटे आणले होते.
🍅 शिक्षिका म्हणाली, " हे अगदी तुम्ही, आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."
🍅 द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.
🍅 "जर तुम्ही टमाट्यांचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल, तर कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्याअंत:करणावर किती परिणाम होत असेल ! "
🍅 अंत:करण ही एक सुंदर बाग आहे. अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते.
🍅 तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा.
🍅 त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.
🍅 आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करूया. कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठी.
--------------------------------------
🌹श्री स्वामी परिवार 🌹
-------------------------------
तुलना करू नका..
-------------------------------
एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता.
दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता.
तो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना?
त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय,
त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.
आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.
असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.
तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत.
काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा.
👉 जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.
👉 इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या.
👉कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात.
👉 कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या.
तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही.
--------------------------------------
🌹 श्री स्वामी परिवार 🌹
----------------------------------------
कोहळा
------------------------------
घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.
--------------------------------------
कोहळा लावण्याची योग्य पध्दत
----------------------------------------
कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.
त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.
त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,
येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.
कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.
पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)
नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.
तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .
एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.
कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.
कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो
चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.
एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो .
----------------------------
बाहेरून कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
--------------------------------------
असे म्हणतात की, अशुभ कार्याला जाऊन आल्यावर पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे, कारण अशुभ शक्ती, दारिद्र्य पायाद्वारे चालत घरात येते. शिवाय पायाला
लागलेल्या धुळीतूनही अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात.
अशी कथा सांगतात की, फार पूर्वीच्या काळी एक राजा अतिशय घमेंडखोर होता. तो कोणाचेही कांही चालवून घेत नसे. एकदा काय झाले, तो राजा प्रजेच्या
दौर्यावर गेला असतां त्यावे पादत्राण तुटले आणि तो पाय धुवून येत असतांना पायाच्या घोट्याजवळ कांही भागाला पाणी लागले नाही, तर तेवढ्या
भागातून शनी त्याच्या राजवाड्य़ात प्रवेश करतां झाला आणि त्याचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले.
म्हणून घरात येण्यापूर्वी पाय सर्व बाजूंनी धुवून घरात यावे.
_____
भस्म
------------------------
व्युत्पत्ती
‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.
व्याख्या
कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
अर्थ
भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्वराची आळवणी करणे’ होय.
-------------------------------
■. भस्माचे महत्त्व
--------------------------------
भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते
----------------------------
. भस्माचा टिळा
------------------------------
शिवभक्तीचे प्रतीक असणे-
भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान
शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात.
तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.
----------------------------------------
■. भस्म लावण्याचा उद्देश
----------------------------------------
आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.
■. भस्माचा वापर
दंडावर भस्माचा वापर
अ.
भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.
अ १.
*भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक
उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।
– ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२
*अर्थ
कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.
आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.
इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.
■. भस्माचे इतर प्रचलित शब्द
विभूती
विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.
. रक्षा
रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.
----------------------------------------
■ भस्मातील औषधी गुण
----------------------------------------
भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.
■ ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असणे
लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. –
------------------------------
भस्माची शिकवण
--------------------------
१.
मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे
२.
मानवी देह हा नश्वर असल्याने मरणानंतर त्या देहाची जळून राखोटी होणार आहे. त्यामुळे कोणीही देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठ्या महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात् यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखितहोते.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
--------------------
जन्मकुंडली म्हणजे काय?
----------------------------------------
खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि जन्मकुंडली नेमके म्हणजे काय? तर चला थोडक्यात जाणून घेऊया
देवाचे काम काय आहे की आपल्याला आईच्या गर्भात गर्भधारणा झाल्यावर पहिल्या दिवसा पासुन ते नवव्या महिन्यात पर्यंत गर्भात आपले रक्षण करणे आणि जसा आपला आईच्या गर्भातून आपला या पृथ्वीवर म्हणजे एका ग्रह वर जन्म होतो तसा या नऊ ग्रहाचा आपल्या जीवनावर प्रभाव सुरू होतो.
जातकाचा जन्म पृथ्वीवर झाल्यावर वरते या ग्रहाची स्थिति काय आहे ते आपल्या जन्मदिनांक, जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून पंचागच्या आधारे ग्रह- नक्षत्र-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली व कुंडलीतील ग्रहांची स्थिती नुसार ग्रह हे जीवनावर प्रभाव करतात.
कुंडलीत जे आकडे असतात त्यांना जन्म लग्न असे म्हणतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे
पण प्रथम आपल्याला ज्योतिषाची थोडी माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषास जन्म वेळ, तारीख आणि जन्मठीकाण सांगतो .तेव्हा ज्योतिषी एक कुंडली तयार करतो .ही कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा नकाशा . म्हणून
आज ह्या लेखात कुंडलीमध्ये जी १२ स्थाने असतात त्यांची माहिती सांगेन.
*१) पहिले स्थान -लग्नस्थान
या स्थाना वरून माणसाचे आयुष्य, रंग, उंची, रूप, स्वभाव, डोके, मेंदू या गोष्टी पहिल्या जातात.
*२) दुसरे स्थान – धनस्थान
या स्थाना वरून माणसाला मिळणारा पैसा, त्याचे डोळे, बोलणे, वाणी (मधुरता, कुटुंबातील व्यक्ती, त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात.
*३) तिसरे स्थान -पराक्रम स्थान
या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश, छोटे प्रवास, लहान भावंडे, हात, श्वसनसंस्था पहिली जातात.
*४) चौथे स्थान -सुख स्थान
या स्थानावरून प्राथमिक शिक्षण (10/12 पर्यंतचे) वाहनसुख, गाडी, बंगला, मालमत्ता, आई, माणसाचे मन, जमीन या गोष्टी पाहतात.
*५) पाचवे स्थान -संतती स्थान/विद्या/
महालक्ष्मी स्थान
नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, उच्च शिक्षण, विवाह स्थळ, शेयर मार्केट,सट्टा बाजार, यश, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन, पाठीचा कणा या गोष्टी पाहतात
*६) सहावे स्थान -रिपू स्थान
या स्थानावरून आपले शत्रू , आजार, रोग, पोट, मामा, पाळीव प्राणी, कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात
*७) सातवे स्थान –विवाह स्थान
हे जोडीदाराचे स्थान आहे. जोडीदाराचे रंग रूप, स्वभाव, इत्यादी, शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात.
*८) आठवे स्थान -मृत्युस्थान
यावरून मृत्युच्या वेळची परिस्थिती, गुप्तधन, वारसा हक्काचे धन, गुप्त गोष्टी पहिल्या जातात.
*९) नववे स्थान – भाग्य स्थान/ पुर्व जन्म कर्म स्थान/ धर्मस्थान
या वरून दूरचे प्रवास, यात्रा, धार्मिक गोष्टी, न्यायखाते, उपासना, नातू,पणतू (मुलाचे मुल), पाय या गोष्टी पाहतात.
*१०)दहावे स्थान -कर्मस्थान
पिता, व्यापार, व्यवसाय, माणसाचा नोकरी धंदा, पदोन्नती, त्यातील यश, गुडघे या गोष्टी पाहतात .
*११) अकरावे स्थान -लाभ स्थान/धन संचय स्थान
या स्थानावरून वेगवेगळे लाभ, मित्र परिवार, कान या गोष्टी पाहतात, आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे
*१२) बारावे स्थान -व्यय स्थान
या वरून परदेशी जाणे, हॉस्पिटल, जेल, गुंतवणूक, खर्च होणे या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात
----------------------------------------
मंगळवारी सुख समृद्धी साठी हे उपाय करून बघा
---------------------------------------
मंगळवारी मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यांमध्ये विशेष लाभ मिळू शकतो.
1. प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे. या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो.
2. लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजूला व्यक्तीला द्या. या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते.
3. शिवलिंगावर लाल फूल अर्पित करायला पाहिजे. शिवलिंगावर लाल फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते.
4. मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.
5. एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे. तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या. हा उपाय तुम्ही रोज करू शकता.
6.हा दिवस कर्जापासून मुक्तीसाठी उत्तम मानला गेला आहे.
या दिवशी लाल गायीला पोळी खाऊ घालावी.
7.मंगळवारी हनुमान मंदिर किंवा गणपती मंदिरात नारळ चढवावे.
8. मंगळवारी लाल वस्त्र, लाल फळ, लाल फूल आणि लाल रंगाची मिठाई गणपतीला अर्पित केल्याने मनोकामना पूर्ण होते.
9. मंगळवारी एखाद्या देवी मंदिर किंवा गणपती मंदिरात ध्वजा चढवून आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. पाच मंगळवार पर्यंत असे केल्याने धन मार्गात येणार्या सर्व अडचणी दूर होतात.
10. मनाच्या शांतीसाठी पाच लाल फूल एखाद्या मातीच्या भांड्यात गहूसोबत घराच्या गच्चीवरील पूर्वी कोपर्यात झाकून ठेवावे. एक आठवडा त्यांना हातदेखील लावू नये. पुढील आठवड्याच्या मंगळवारी ते गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलं घरातील मंदिरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व ताण दूर होईल आणि आपल्याला शांती जाणवेल.
11. मंगळवारी या वस्तूंचे प्रयोग करणे किंवा या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे- तांबे, सोनं, केशर, कस्तुरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, शेर, मृगछाल, मसुराची डाळ, लाल कन्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.
Thursday, October 1, 2020
नकारात्मकता' कशी येते ते पहा.
About Yogesh Sapkale
Thanks for reading this article please leave your comment if any
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment