Sunday, October 18, 2020

नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Importance of Nine Colours in Navratri

नवरात्रि रंग २०२०

नवरात्रीचा उत्सव हा चैतन्यपूर्ण रंगांचा जल्लोष असतो आणि तो या उत्सवाच्या आरास, पोशाख आणि रांगोळ्या यामध्ये आपल्या सभोवती दिसून येतो. या नवरात्रीच्या रंगांचे काय वैशिष्ठ्य आहे याबाबत नवल वाटले नां? आपले डोळे दिपवून टाकणाऱ्या या रंगांच्या मागे एक परंपरा, एक संस्कृती आहे.

२०२० नवरात्रीचे नऊ रंग -Colors of Navratri 2020

२०२० नवरात्रीचे नऊ रंग आहेत – पिवळा, हिरवा, राखाडी, नारिंगी, पांढरा, लाल, गडद निळा, गुलाबी आणि जांभळा.


दरवर्षी जरी हे रंग तेच असले तरी त्यांची क्रमवारी नवरात्री कोणत्या दिवशी आहे त्यानुसार बदलत राहते. २०२० च्या नवरात्रीच्या रंगांची क्रमवारी :

दिवसरंगप्रतिपदापिवळा (Yellow)द्वितीयाहिरवा (Green)तृतीयाराखाडी (Grey)चतुर्थीनारंगी (Orange)पंचमीपांढरा (White)षष्टीलाल (Red)सप्तमीगडद निळा (Royal Blue)अष्टमीगुलाबी (Pink)नवमीजांभळा (Purple) नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. नवरात्रीचे हे नऊ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत.

1. पिवळा - Yellow

नवरात्रीचा पहिला दिवस देवीच्या शैलपुरी या रूपाचा. शैलपुरी म्हणजे पर्वत कन्या होय. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात अशा प्रकारे करणे हे फारच विलक्षण आहे.

2. हिरवा - Green

दुसरा दिवस दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारणीचा होय. ब्रहचारणी या रूपात ती अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते. याठिकाणीच तिचा भावी पती भगवान शिव आहे. इथे ती भगवान शिव यांच्याबरोबर सर्वसंगत्याग करते. म्हणून इथे हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि उर्जा यांचे द्योतक आहे.


3. राखाडी - Grey

देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा. या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. राखाडी रंग हा आपल्या भक्तांसाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर अशा तिच्या मनःस्थितीचे सांकेतिक आहे.

4. नारंगी - Orange

कुष्मांडा हे देवीचे चौथे रूप. या रूपात देवी तिच्या मनमोहक हास्याने, तिच्या दैदिप्याने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते. ती इतकी शक्तीशाली आहे की सूर्यावर निवास करू शकते. आणि म्हणूनच नारंगी रंग हा तिचा आनंद आणि ऊर्जा याचे सूचक आहे.

5. पांढरा - White

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार हा एका आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. जेंव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे. आणि
म्हणूनच पांढरा रंग आहे.


6. लाल - Red

देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश याचेसुद्धा प्रतिक आहे.

7. गडद निळा - Royal Blue

देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली आहे.

8. गुलाबी - Pink

देवीचे आठवे रूप महागौरी आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग हा आशा आणि ताजेपणाच्या यथार्थतेचे प्रतिक आहे.


9. जांभळा - Purple

सिद्धीदात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे.
देवीची विविध नाम आणि रूपे चित्तवेधक आणि मनोहारी आहेत, हो नां? म्हणून जेंव्हा तुम्ही यावर्षी उत्सवात सामील व्हाल, तेव्हा रंगांचा हा क्रम लक्षात ठेवा आणि दररोज वेगवेगळे पोशाख आणि त्याचबरोबर त्या पोषाखाशी अनुरूप मिळतीजुळती आभूषणे घाला. अशा प्रकारे नवरात्रीच्या रंगांचे महत्त्व माहित झाल्यामुळे ती तुम्ही तुमच्या दिसण्यातून योग्यप्रकारे अभिव्यक्ती व्यक्त करु शकाल.

माहिती संकलनः श्री दीपक कुळकर्णी.

 

Navratri colors meaning, navratri colors 2020, which colour dress to wear in navratri, navratri colours of 2019 marathi, chaitra navratri colors 2020, navratri colours march 2020, chaitra navratri colours 2020, navratri colours 2021

No comments:

Post a Comment